ही बायको सारखे डोक खाते..!!

प्रत्येक नव-याला वाटते की,
त्याची बायको डोक खाते..
का खरच ती अशी असते..??
पण दिसते तसे मुळीच नसते..!!

घरात आणखी कोण असते..
ज्याच्यावर ती हक्क गाजवते..
एक नवराच तिचा असतो..
ज्याच्या कडे ती मनातले बोलते..!!

तिच्या बोलण्या मागे खरे..
सा-यांबद्दल आत्मियता असते..
नाहीतर दाखवा मला..
घरात आणखी कोण राबते..!!

ऑफिस मधे तुमच्याकड़े….
एक आघाडी (डिपार्टमेंट) असते..
पण घरात मात्र ती..
अनेक आघाड्या एकाकी लढते..!!

सहाजिक तिची मदार तुमच्यावर असते..
भरवश्यावर तुमच्या ती सारे करते ..
मग जराश्या बोलण्याने सांगा..
तुमचे का हो तारतम्य सुटते..!!

क्षणाचा असतो रुसवा तिचा..
एका गज-यात पहा विरघळते..
दिवसभराचा क्षीण विसरून..
कुशीत रात्री कशी विसावते..!!

इतके सारे करून सांगा..
तिच्या हातात काय उरते..
आपण मात्र नेहमीच म्हणतो..
ही बायको सारखे डोक खाते..!!

Dedicated to respective wife…!

2 thoughts on “ही बायको सारखे डोक खाते..!!”

Comments are closed.