कुटुंबात राजकारण ?

नवीन सून येता घरी
सासू सासरे सत्ताधारी

सुनेवरती दडपण भारी
नीष्ठा दाखवावी सासरघरी ।।

नणंद आणि सासूबाई
नकळत युती करी ।।

जावा जावांच्या जोड्या
जमवू लागती आघाड्या

विरोधी पक्षही थोड्या
करू लागती खोड्या ।।

स्वतंत्र मागण्या जो-तो करी
आपापला ‘ईगो’ गोंजारी

भाऊबन्दकीच्या आहारी
बोलणी करण्याचे नाकारी ।।

घरातल्याना भीती भारी
परक्या हाती सत्तेची दोरी

उचंबळून येते अचानक
जावयाची बंडखोरी ।।

पतीपत्नीचा परस्पर विश्वास
समजुतीने करता प्रवास

लोकशाही नांदण्या कुटुंबात
संवादाचा असावा अट्टाहास ।।

————
वर्षा पवार तावड़े

 FamilyLivingPicture

1 thought on “कुटुंबात राजकारण ?”

Comments are closed.